' खाकी'ला मलिन करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करू तेजस्वी सातपुते : मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट
सेवाव्रत निष्ठेने जोपासताना मोठया कष्टाने कमविलेल्या वीवर कुठलाही कलंक लागणार नाही , याची सर्वतोपरी खबरदारी घ्या .
मी अधिकारी म्हणून पोलीस दलाच्या पाठीशी आहे . मात्र खाकी वर्दीची प्रतिमा मलिन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करू , असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वीसातपुते यांनी दिला . सातपुते यांनी बुधवारी दुपारी मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली .
त्यांनी पोलिसांशी संवाद साधला . त्या म्हणाल्या , पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची दखल घ्या . त्यांच्या तक्रारीची नोंद घ्या . त्यांना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे . पोलीस विभाग शिस्तप्रिय आहे . कोणताही कर्मचारी , अधिकारी नियम पायदळी तुडविताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल . समाजात वावरताना स्वतःची वर्तणूक चांगली ठेवा ; अन्यथा | स्वतःच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांची प्रतिमा खराब होणार आहे . अवैधधंदेवाल्यांशी कसल्याही प्रकारचे संबंध ठेवू नका . तसे आढळून आल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईल ,
असा इशारा पोलिसांशी संवाद साधताना दिला . यावेळी त्यांनी पोलिसांच्या निवासाप्रश्नी पाठपुरावा करू , अशी ग्वाही दिली . महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत राहू , शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या . कर्नाटक सीमेवरील गुटखा तस्करी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करू , असे सांगितले . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील , पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे उपस्थित होते
0 Comments