google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. स्व. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

Breaking News

मा. स्व. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

 मा. स्व. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा : नगरसेवक सुरज दादा बनसोडे


सांगोला/प्रतिनिधी :मा. स्व. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीदिनी सांगोला नगरपालिकेचे आरपीआयचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी गणपतराव देशमुख यांचा सांगोला शहरामध्ये पुतळा उभा करण्याचा ठराव मंजूर करावा असे निवेदन सांगोला नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले असून, 

त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज देशमुख कुटुंबीय यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे देशमुख यांच्या निवासस्थानी आले असता, नगरसेवक सुरज दादा बनसोडे व जिल्हा उपाध्यक्ष अरुण अण्णा बनसोडे यांच्या मध्ये पुतळा संदर्भात चर्चा झाली.

 त्यावेळी आठवले साहेबांनी सांगितले की डॉ. गणपतराव देशमुख यांनी नेहमीच दिनदलित, गोरगरीब, मुस्लिम, कष्टकरी, शेतकरी सर्व बांधवांना आयुष्यभर सहकार्य केले. त्यांची छत्रछाया असल्यामुळे तालुक्यातील सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत होता. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणे हे सर्वच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व सर्वतोपरी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी आदरांजली. 

यावेळी आरपीआयचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण आण्णा बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील सर्वगोड, महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड, करमाळा रमेश कांबळे, प्रवीण तोरणे, बालम बनसोडे, दीपक चंदनशिवे, पोपट तोरणे, किशोर झेंडे, निखिल गडहिरे लक्ष्‍मण कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments