google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाप रे! कोरोनानंतर वटवाघळांमुळे पसरतोय हा व्हायरस, आहे कोरोनापेक्षा धोकादायक ;

Breaking News

बाप रे! कोरोनानंतर वटवाघळांमुळे पसरतोय हा व्हायरस, आहे कोरोनापेक्षा धोकादायक ;

बाप रे! कोरोनानंतर वटवाघळांमुळे पसरतोय हा व्हायरस, आहे कोरोनापेक्षा धोकादायक ; जाणून घ्या लक्षणे..


 मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातले होते. वटवाघूळांमुळे परसलेल्या या घातक व्हायरसने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला. अजूनही जगावरून कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशाच परिस्थितीत आता वटवाघूळांमुळे पसरणाऱ्या अजून एका व्हायरसचा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने

  सांगितले आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच् म्हणण्यानुसार, च्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी दक्षिणी ग्वाइडो प्रांतात झाली व आता १५० पेक्षा जास्त लोकांना त्याच्या या विषाणूची लागण झाली आहे. नुकतेच यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या व्हायरस पहिल्यांदा निदान १९६७  मध्ये करण्यात आले होते. 

हा संसर्ग रक्तस्रावी ताप निर्माण करण्यास सक्षम आहे व हा इबोला सारखाच आहे. हा एक गंभीर आजार आहे ज्याचे घातक परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया या व्हायरसविषयी मारबर्ग वायरसचा मृत्य दर ८८ % वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आफ्रिकेचे प्रादेशिक संचालक डॉ मतशीदिसो मोएती म्हणाले की, मारबर्ग विषाणूची दूरदूरपर्यंत पसरण्याची क्षमता याचा अर्थ आपल्याला त्याच्या ट्रॅकमध्ये थांबवने आवश्यक आहे. डब्ल्यूएचओच्या मते  मारबर्ग विषाणू  वटवाघळांद्वारे पसरतो व त्याचा मृत्यू दर ८८ टक्क्यांपर्यंत आहे. मारबर्ग विषाणू  इबोला विषाणू व कोरोनापेक्षा प्राणघातक असल्याचे म्हटले जात, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो.मारबर्ग व्हायरस कसा पसरतो ?हा विषाणू संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक द्रव्याच्या देवाणघेवाणीद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो. डब्ल्यूएचओने  या विषाणूबद्दल माहिती दिली आहे 

की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या संपर्कात येते, तेव्हा शरीरामधुन बाहेर पडणारा द्रव पदार्थ पृष्ठभाग व अनेक वस्तू दूषित करतो.यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर, व्यक्तीला इतका वाईट संसर्ग होतो की योग्य उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्युदेखील होऊ शकतो. हा कालावधी २ ते २१ दिवसांचा असू शकतो. एका आठवड्यामध्ये तुम्हाला त्याची लक्षने दिसू लागतील.मारबर्ग व्हायरसची सामान्य लक्षने

अतिसार

मळमळ

पोटदुखी

अस्वस्थता

तीव्र डोकेदुखी

ताप

थकवा

Post a Comment

0 Comments