google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांना पाच कोटी रुपये मंजूर: आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांना पाच कोटी रुपये मंजूर: आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांना पाच कोटी रुपये मंजूर: आमदार शहाजीबापू पाटील


       

सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांना पाच कोटी रुपये मंजूर: आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला/ प्रतिनिधी :सांगोला नगरपरिषदेच्या छत्रपती शवाजी महाराज चौक येथील धान्य बाजारातील नवीन व्यापारी संकुलासाठी तीन कोटी रुपये तसेच महात्मा फुले भाजी मंडई येथील बाजार कट्टे व दुकान गाळे याच्यासह पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह बांधणे या कामासाठी दोन कोटी रुपये असे एकूण पाच कोटी रुपये नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून सांगोला नगरपरिषदेला मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये 21 ऑगस्ट रोजी दिली. 


यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक पी. सी. झपके, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर यांच्यासह माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, उदय बापू घोंगडे ,प्राध्यापक संजय देशमुख, गटनेते सोमनाथ लोखंडे, अनिल खडतरे,आनंद घोंगडे, सोमेश यावलकर आधी नगरसेवक तसेच सांगोला तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांना भरघोस निधी देण्याची मागणी केली होती.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शॉपिंग सेंटर ,महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई सुधारणा व पहिल्या मजल्यावर नवीन बहुउद्देशीय सभागृह बांधणे तसेच वंदे मातरम चौक ते मिरज रेल्वे गेट पर्यंत बायपास रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह नूतनीकरण करणे यासह नगर परिषद कार्यालयातील नवीन इमारतीमध्ये फर्निचर इत्यादी कामांसाठी निधीची मागणी केली होती. 


यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला हप्ता म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील धान्य बाजारातील नवीन शॉपिंग सेंटर साठी तीन कोटी व महात्मा फुले भाजी मंडई परिसरातील बाजार दुकान पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी दोन कोटी असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून उर्वरित कामासाठी लवकरात लवकर निधी दिला जाणार असल्याची ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली .


 सांगोला शहरातील प्रलंबित असणाऱ्या भुयारी गटार योजनेला ही लवकरच मंजुरी मिळणार असून शहरातील इतर विकास कामांना भरघोस निधी मिळणार असून येणाऱ्या कालावधीमध्ये सांगोला शहराचा नियोजनबद्ध चौफेर विकास करण्यासाठी सदैव तत्पर असेन असे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments