google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्य हादरलं : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नरबळीचा प्रकार ?

Breaking News

राज्य हादरलं : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नरबळीचा प्रकार ?

 राज्य हादरलं : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नरबळीचा प्रकार ? 


मूल होत नसल्याने मित्राच्या मुलाचा बळी दिला ?कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा त्याच्या वडिलांच्या मित्रानेच बळी घेतला . हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून पोलिसांनी मात्र ही शक्यता तूर्तास नाकारली आहे . वरद याचा त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे मृतदेह आढळून आला . 


संशयित दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य ( वय ४५ , रा . सोनाळी ) याला मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले . दत्तात्रय हा वरदचे वडील रविंद्र पाटील यांचा मित्र आहे . या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली . अजून या घटनेचे खरं कारण समोर आलेले नाही . पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,सोनाळी ( ता . कागल ) येथील सात वर्षांचा वरद मंगळवारी सायंकाळी त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे कुटूंबियांसह गेला होता . मामाच्या घरी वास्तुशांती होती . रात्री आठ वाजता तो घरातून बाहेर पडला . बराच वेळ तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही .


 अखेर त्याच्या अपहरणाचा संशय व्यक्त करणारी फिर्याद मुरगूड पोलिसांत पालकांनी दिली .दोन दिवस तपास करीत असताना पोलिसांनी तो ज्याच्याबरोबर बाहेर पडला , त्या दत्तात्रय वैद्य याच्याकडे चौकशी केली . तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . त्याने आपणच वरदचा खुन करुन मृतदेह लपविल्याची माहिती दिली . काल पोलिसांनी वैद्य याला बरोबर घेऊन सावर्डे गावात लक्ष्मीनगर भागात जाऊन वरदचा मृतदेह शोधून काढला . 


या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली . सोनाळी व सावर्डे येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली . आरोपीला समोर आणल्याशिवाय आम्ही मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली . त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला यावेळी उपविभागीय पोलिसअधिकारी आर आर पाटील मुरगुड चे सहाय्यक निरिक्षक विकास बडवे यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र लोक संतप्त होते .


 दरम्यान दत्तात्रय वैद्य याला मूल नव्हते , त्यामुळे मूल होण्यासाठी त्याने मित्राच्या मुलाचा बळी दिला असा आरोप ग्रामस्थांमधून होत होता . दरम्यान या संदर्भात अजूनही पोलिसांनी पुष्टी दिली नाही . तपासात या मधील खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले . पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे , अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली . अधिक तपास फौजदार किशोर खाडे , के.डी.ढेरे , सतीश वर्णे , स्वप्निल मोरे , संदिप ढेकळे , राम पाडळकर आदी करत आहेत .

Post a Comment

0 Comments