google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या 7 मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची दामदुप्पट ठेव

Breaking News

आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या 7 मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची दामदुप्पट ठेव

 आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या 7 मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची दामदुप्पट ठेव


सांगोला/ प्रतिनिधी :सांगोला नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांच्या वाढदिवसादिनी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या 7 मुलींच्या नांवे प्रत्येकी 15 हजार रुपयांची दामदुप्पट ठेव ठेवण्यात आली आहे. स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्या 7 मुलींच्या नातेवाईकांना त्याबाबतचे एफ.डी. प्रमाणपत्र सदर कार्यक्रमामध्ये वाटप करण्यात आले.यामध्ये प्रियांका सतीश यमगर (घेरडी), कल्पना प्रकाश भोसले (चिंचोली), सोनाली प्रवीण बाबर (मानेगाव), अक्षता अजय महामुनी (भोसे), वर्षा जगन्नाथ खैरमोडे (मंगेवाडी), तेजश्री अजित पैलवान (सांगोला), रेश्मा निलेश लोखंडे (सांगोला) या सात नातेवाईकाकडे एफ.डी. प्रमाणपत्र देण्यात आले.मुलीच्या शिक्षणाकरिता तसेच तिच्या लग्नाकरिता ही रक्कम वापरता यावी यासाठी ही ठेव योजना 2016 सालापासून आनंदा(भाऊ) माने यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. 2016 साली 5 मुलींच्या नावे प्रत्येकी 5 हजार रु, 2017 साली 4 मुलींच्या नावे 7 हजार रु, 2018 साली 2 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 हजार रु, 2019 साली 4 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 हजार रु आणि आता 2021 साली 7 मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रुपयांची दामदुप्पट ठेव ठेवण्यात आली आहे.यावेळी सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी त्यांच्या मनोगतामध्ये या दामदुप्पट ठेव योजनेबद्दल माहिती सांगितली. तसेच सांगोला शहराच्या जडणघडणीत आबासाहेबांचे मोठे योगदान आहे. जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने त्यांनी सहकारी संस्था उभारल्या तसेच महिलांना रोजगार मिळावा यासाठी देशातील पहिली महिला सुतगिरणी उभारली. त्यांनी नेहमी जनतेचा विचार केला. त्यामुळे आबासाहेबांसारखा लोकनेता पुन्हा कधीच होणार नाही. सांगोला पंचायत समितीच्या सभापती सौ. राणीताई कोळवले यांनी बोलताना सांगितले की, आनंदा माने यांनी या ठेव योजनेच्या माध्यमातून एक चांगला स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. तसेच स्व. आ. गणपतराव देशमुख यांच्यामुळेच महिलांना नेहमी महत्वाची पदे दिली गेली आहेत. सर्व समाज एकत्र करून त्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत.त्याचबरोबर नगरसेविका सौ. स्वातीताई मगर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले की, आनंदा(भाऊ) माने यांनी चालू केलेला हा उपक्रम तसाच चालू राहो. तसेच आबासाहेबांमुळे आम्ही आज पदावर असून त्यांच्या त्यांचा आम्हाला कमी पण मोलाचा सहवास लाभला. एखाद्या विषयांवर चर्चा करताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन मग चर्चेला यायचं, असं साहेब नेहमी सांगत त्यामुळे आम्हाला सगळी माहिती कळू लागली. अशाप्रकारे आम्हा महिलांना सक्षम बनविण्यामध्ये आबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, पंचायत समिती सभापती सौ. राणीताई कोळवले, नगरपरिषद बांधकाम सभापती तथा राजमाता महिला सह. पतसंस्थेच्या चेअरमन सौ. अप्सराताई ठोकळे, नगरसेविका स्वातीताई मगर, नगरसेविका छायाताई मेटकरी, व्हा. चेअरमन प्रियांका श्रीराम, संचालिका सौ. कविता वाघ, संचालिका सौ. नकुशा जानकर, पतसंस्थेच्या सचिव सौ. मनीषा हुंडेकरी, सौ. पल्लवी कांबळे, सौ. मधुमती माळी, इनामदार मॅडम, शेखर गडहिरे, नितीन जानकर, अजित माने आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार राजमाता महिला पतसंस्थेच्या सचिव सौ. मनीषा हुंडेकरी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments