भारतीय जनता पार्टीची शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक - चेतनसिंह केदार-सावंत कार्यकारणी निवडीबरोबर आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा होणार
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी निवड व आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उद्या शुक्रवार 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल जोतिर्लिंग येथे आयोजित केली आहे. या बैठकीला तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले आहे.सांगोला तालुक्यात भारतीय जनता पार्टीची मजबूत बांधणी करण्यासाठी जम्बो कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सांगोला शहरातील वाढेगांव नाका येथील हॉटेल जोतिर्लिंग या ठिकाणी सांगोला तालुक्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला सांगोला तालुका भाजपची कार्यकारणी जाहीर करण्याबरोबर आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर विविध संस्थाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच केंद्राच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे, पक्ष संघटना मजबूत करणे, गावागावात भाजपच्या शाखा स्थापन करून घराघरात भाजपचा कार्यकर्ता तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, समस्या यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. भाजपची ही महत्वपूर्ण बैठक असल्याने तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले आहे.
0 Comments