माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या हस्ते ॲड महादेव कांबळे यांचा सत्कार संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी)- दिनांक 28 जून रोजी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते ॲड. महादेव कांबळे यांनी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला होता त्यानंतर दिनांक 13 जुलै रोजी सोलापूर येथे 'जनवात्सल्य' बंगल्यावरती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांची ॲड कांबळे यांनी भेट घेतली त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये आल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी लहुजी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटोळे उपस्थित होते सांगोला तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा पक्ष आपल्या सदैव पाठीशी राहील काँग्रेस हा देशातील सर्वसामान्य बहुजन वर्गाच्या आधार आहे आपण ही पक्षामध्ये सक्रिय होऊन पक्षवाढीसाठी काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या आदेशाने काम करणार असल्याचे मत ॲड महादेव कांबळे यांनी व्यक्त केले .तसेच पुढील काळामध्ये सांगोला तालुक्यांतील दलित-बहुजन वर्गातील कार्यकर्ते लवकरच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचेही मत ॲड कांबळे यांनी व्यक्त केले.
0 Comments