चालकाचा ताबा सुटून रुग्णवाहिका पलटी ; कोरोनाग्रस्त भाऊ ठार , बहीण जखमी अनिल भीमराव कदम ( वय ४१ , रा . महूद , ता . सांगोला ) असे मृताचे नाव आहे . तर वर्षा भीमराव कदम व रुग्णवाहिकेचा चालक या दोन जखमींचा समावेश आहे .
महूद येथील अनिल कदम याला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नव्हती . त्यामुळे तो घरीच उपचार घेत होता . मंगळवारी . अचानक त्याचा श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बहीण वर्षा कदम हिने पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटलची रुग्णवाहिका मागवून घेतली . महूदहून दुपारी ३.३० च्या सुमारास वर्षा कदम या भाऊ अनिल कदम यास तपासणीसाठी पंढरपूरला घेऊन निघाल्या .दरम्यान , भरधाव रुग्णवाहिकेवरील चालकाचा गादेगाव ( पंढरपूर ) फाट्यानजीक ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली . अपघातात अनिल कदम याच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाला . तर बहीण वर्षा कदम व चालक दोघेही गंभीर जखमी झाले होते . नागरिकांनी हलवले रुण्णालयात अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेऊन मृत व जखमींना अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतून बाहेर काढले . त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले . याबाबत सिस्टर उडानशिवे यांनी पोलिसात खबर दिली .
0 Comments