महूद - सांगोला रस्त्याची दयनीय अवस्था शिवणे ( ता . सांगोला ) या गावामधील मुख्य चौकातील रस्त्यावर पडलेल्या खड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत असून त्यामधून वाहनधारकांना कसरत करावी आहे .
महद / प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील महूद सांगोला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून , वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून कानाडोळा होत आहे . पावसाने रस्ता जागोजागी उखडला आहे , तर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत . त्यामुळे अपघातांची मालिका सुरू असून , या मार्गावरून प्रवास करताना अंगाचा खिळखिळा अन् वाहनांचा खुळखुळा ' अशी अवस्था होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत . या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी , अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे . सांगोला- महूद - अकलूज या रस्त्याचा भाग असलेला शिवणे गावामधील मुख्य चौकातील हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे .नेहमीच वाहतुकीसाठी वर्दळीचा असलेल्या सांगोला महुद या रस्त्यावर शिवणे या रस्त्यावर ती मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे . यामुळे वाहनधारकांना पाण्याचा व खाड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे . तसेच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची नेहमीच ये - जा होत असते . तसेच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते परंतु या मार्गावरून जाण्यासाठीची वाट बिकट झाली आहे . यामुळे या रस्त्यावरून जाणे मुश्कील झाले आहे . यामुळे या रस्त्यावरून आपला जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे . तरी संबंधीत विभागाने त्वरीत रस्त्यावरील खड्डे भरून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे .
0 Comments