google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोल्हापूर : आईचे तुकडे तुकडे करून तेल , मीठ , चटणी लावून भाजून खाणाऱ्या राक्षसी मुलाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Breaking News

कोल्हापूर : आईचे तुकडे तुकडे करून तेल , मीठ , चटणी लावून भाजून खाणाऱ्या राक्षसी मुलाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

 कोल्हापूर : आईचे तुकडे तुकडे करून तेल , मीठ , चटणी लावून भाजून खाणाऱ्या राक्षसी मुलाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा


कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : आईचे तुकडे तुकडे करून तेल , मीठ , चटणी लावून भाजून खाणाऱ्या राक्षसी मुलाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे . सुनील रामा कुचकोरवी ( वय ३५ , रा . माकडवाला वसाहत , कोल्हापूर ) याने ८० वर्षाच्या आईचा ५ वर्षापूर्वी अमानुष खून केला होता . या आरोपीला मरेपर्यंत फाशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे . आरोपीने पाच वर्षापूर्वी सत्तूरने आपल्या आईचा गळा दाबून खून केला होता आणि तिच्या शरिराचे तुकडे तुकडे करून तेल , मीठ , चटणी लावून भाजून खाल्लं होतं . त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते . आज या प्रकरणाची सुनावणी झाली . जिल्हा न्यायाधीश ( वर्ग ४ ) महेश कृष्णाजी जाधव यांनी त्याला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड तसेच ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे .करवीर नगरी ही अंबाबाईचे निवासस्थान आहे . मातेचा अत्यंत निघुणपणे खून खरून तिच्या शरिराचे तुकडे करून तेल , मीठ , चटणी लाऊन भाजून खाणाऱ्या आरोपीचे कृत्य समाज मनावर परिणाम करणारे आहे , असे निकालपत्रात म्हटले आहे . अशा प्रवृत्तीला कठोरतील कठोर शिक्षा दिली जाईल , असे न्यायालयाने म्हटले आहे .

Post a Comment

0 Comments