google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नूतन पदाधिकाऱ्यांचा दीपक साळुंखे-पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Breaking News

नूतन पदाधिकाऱ्यांचा दीपक साळुंखे-पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

 नूतन पदाधिकाऱ्यांचा दीपक साळुंखे-पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


सांगोला (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी युवती सेलच्या  कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली असून, युवती सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रज्ञा कांबळे यांची, सांगोला तालुका अध्यक्षपदी अंकिता शिंदे तर शहराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची निवड झाली असल्याचे युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले यांनी जाहीर केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील  यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजी पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी बनकर, नगरसेवक सोमनाथ लोखंडे, चंचल बनसोडे आदी उपस्थित होते.या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले म्हणाल्या, युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारिणीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक तालुक्‍यांतील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात महिलांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय राहिले पाहिजे, या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या शिकवणीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी दिली आहे. आगामी काळात महिला व विशेषतः युवतींच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नावर आवाज उठवून महिलांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सांगोला तालुका अध्यक्षपदी अंकिता शिंदे, शहराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील तर सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रज्ञा कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.आगामी काळात पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू आणि शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, दीपक साळुंखे- पाटील, जयमाला गायकवाड, सक्षणा सलगर, श्रीया भोसले यांना अभिप्रेत असणारे पक्ष संघटनेचे काम करू, असा विश्वास या वेळी युवती सेलच्या नूतन तालुकाध्यक्षा अंकिता शिंदे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments