google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चक्क पोलिस पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण नेले हिसकावून

Breaking News

चक्क पोलिस पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण नेले हिसकावून

 चक्क पोलिस पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण नेले हिसकावून


सांगोला / प्रतिनिधी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचे पूजन करून महिला घराकडे परतत असताना , दिवसा ढवळया महिलांच्या घोळक्यातून अज्ञात चोरटयाने चक्क पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळयाचे मंगळसूत्र गंठण चोरून अज्ञात चोर गायब झाला . ही घटना सांगोला शहरातील पुजारवाडी येथे गुरुवार दि . २४ रोजी घडली आहे . सिनेस्टाइलने चोरी करून अज्ञात चोरटयाने पोलिसांसमोर एक आव्हान ठेवले आहे . पुजारवाडी येथे माळीसमाज एकत्रित वास्तव्यास असून हा परिसर नेहमी गजबजलेला असतो . अशा ठिकाणी सणावाराच्या वेळी समूहाने महिला हळदी कुंकवासाठी एकत्रित जमा होऊन सर्व कार्यक्रम पार पाडत असतात . गुरुवारी वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने महिला वर्ग वडपूजनाच्या व हळदी कुंकवाच्या निमित्ताने बाहेर पडला होता . या संधीचा फायदा घेऊनपुजारवाडी येथे दाट वस्तीच्या ठिकाणी भर दुपारी चोरटयाने पुजारवाडीत रहिवासी असलेल्या पोलिसांच्या पत्नीच्या गळयातील दागिने हिसकावून चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे . यामुळे पोलिसांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर , इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा काय ? असाही सवाल नागरिकांच्या चर्चेमधून समोर आला . चोरट्याने सिनेमा स्टाइलने चोरी करून दुचाकीवर धूम ठोकल्याने या अज्ञात चोरटयाला पकडण्यात नागरिकांना व पोलीस पतीला अपयश आले . याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला की नाही यासंदर्भात उशिरापर्यंत माहिती मिळाली नसल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले . मात्र सिनेस्टाइलने चोरी करून अज्ञात चोरट्याने पोलिसांसमोर एक आव्हान ठेवले आहे . एव्हडे मात्र नक्की आहे . चैन स्नॅचिंगच्या या प्रकरणाचा सांगोला पोलीस किती दिवसात छडा लावणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

Post a Comment

0 Comments