google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तरुणीवर रुग्णालयातील ऑपरेशन थेटरमध्येडॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू

Breaking News

तरुणीवर रुग्णालयातील ऑपरेशन थेटरमध्येडॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू

 धक्कादायक ! शस्त्रक्रियेवेळी तरुणीवर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू


प्रयागराज – माणूस जेव्हा मृत्यूशी झुंज देत असतो त्यावेळी त्याच्यासाठी डॉक्टरच देव असतो. डॉक्टर अनेकांना जीवनदान देतात. मात्र प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका तरुणीचं आयुष्य डॉक्टरांनीच उद्ध्वस्त केलं आहे.प्रयागराजमधील तरुणीवर रुग्णालयातील ऑपरेशन थेटरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडितेचं ऑपरेशन झालं होतं. मात्र ऑपरेशननंतर तरुणी त्रासलेली दिसून येत होती. तिला काही तरी सांगायचं होतं. मात्र तिला बोलणं कठीण झालं होतं. पीडितेच्या भावाने तरुणीकडे पेन आणि कागद दिला. त्यावर तिने लिहिलं की, येथील डॉक्टर चांगले नाहीत. उपचाराच्या नावावर या लोकांनी माझ्यावर अत्याचार केले.प्रयागराजमधील एसआरएन रुग्णालयातील डॉक्टरांवर मिर्झापूर येथील तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. पीडितेला आतड्यांच्या आजारामुळे २९ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १ जून रोजी पीडितेला सर्जरीसाठी ऑपरेशन थेअटरमध्ये नेण्यात आलं होतं. तिथेच तरुणीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं तरुणीने कागदावर लिहून दिल.या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी सत्येंद्र तिवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस तरुणीचा जबाब नोंदविण्यासाठी पुन्हा येणार होते. त्यापूर्वीच पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा डॉक्टरांनी केलेल्या अत्याचाराची माहिती लिहितांनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.एसआरएन रुग्णालयाने डॉक्टरांविरुद्ध पीडितेने केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे.

Post a Comment

0 Comments