google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सामाजिक बांधीलकी जपत सांगोला राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन साजरा :-दिपकआबा साळुंखे -पाटील

Breaking News

सामाजिक बांधीलकी जपत सांगोला राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन साजरा :-दिपकआबा साळुंखे -पाटील

 सामाजिक बांधीलकी जपत सांगोला राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन साजरा :-दिपकआबा साळुंखे -पाटील 

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आर्थिक मदतीसह केला सन्मान


सांगोला/प्रतिनिधी :- मागील वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाचा सामना संपूर्ण जगाला करावा लागत आहे.अशा परिस्थितीत कोरोनाबाधित मृत शरीराचा अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आर्थिक मदतीसह व तालुक्यातील प्रशासकीय विभागातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करीत त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान करून सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपली आहे.असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी गुरुवार 10 जून रोजी राष्ट्रवादी भवन येथे बोलताना काढले.यावेळी कोरोना महामारीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत असणारे तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,पोलीस निरीक्षक सुहास जगताप,आरोग्य अधीक्षक डॉ संदीप देवकते व करोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपरिषदेच्या 20 कर्मचाऱ्यांचा आर्थिक मदत देत यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मा.आम दिपकआबा साळुंखे- पाटील म्हणाले ज्या-ज्या वेळी देशावर आपत्तीजनक संकट आली, त्या त्या वेळी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने सर्वसामान्यांना मदत करण्याचे कार्य केले आहे.मागील वर्षभराच्या काळात सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रवादीने मदतीचा हात दिला आहे.त्याचप्रमाणे शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन करीत प्रशासनातील महसूल,पंचायत समिती,नगरपरिषद, पोलीस व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारणे गरजेचे होते . हा स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त होत असल्याने मी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत प्रा.कळेल यांनी देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पुलोद सरकार या विषयावर पी.एच.डी. केल्याबद्धल मा.आम. दिपकआबांनी फेटा,शाल व बुके देऊन सत्कार केला.यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, मा. जि. प.अध्यक्षा जयमलाताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंदे,शाहराध्यक्ष तानाजीकाका पाटील,तालुका युवक अध्यक्ष अनिलनाना खटकाळे,डॉ पियुष साळुंखे-पाटील,नगरसेवक सोमराव लोखंडे,अनिल खडतरे,माजी उपसभापती शोभाताई खटकाळे,नगरसेविका पूजा पाटील, सुनीता खडतरे,महिला सखूताई वाघमारे, जवळा गावच्या सरपंच सौ.सविता बर्वे, शुभंगी पाटील,अनुराधा पाटील,माजी नगरसेवक नाथा जाधव,विजय यलपले,विजय पवार,सरपंच नंदकुमार दिघे,अनिल दिघे,डॉ धनंजय पवार,ऍड संपतराव पाटील,दादा खडतरे,आलमगीर मुल्ला,सतिश काशीद , संतोष पाटील,दत्ता बर्वे,नारायण माळी, बापू कोळेकर,चंद्रकांत करांडे,शहाजी खरात,शिवाजी कोळेकर, हिंदुराव घाडगे,दिलीप मोटे,सुनीलआबा साळुंखे,चंद्रकांत चौगुले,अमर घाडगे,दिलीप नागणे,ज्ञानेश्वर शिंदे,अजित गोडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते-- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तहसील कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी यांचेसह, पंचायत समिती,नगरपरिषद ,पोलीस स्टेशन,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळल्यानेच कोरोना काळात चांगले काम करत आले.आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान झाल्याने आम्हा सर्वांना अधिकचे कार्य करण्याचे ऊर्जा मिळाली आहे . प्रशासकिय यंत्रणेने केलेल्या कार्याची दखल घेतल्या बद्दल निश्चतच अभिमान वाटत असून यापुढेही पदाधिकारी,अधिकारी व नागरिक यांचा समन्वय साधून काम होईल असा विश्वास वाटतो. अभिजित पाटील - तहसीलदार सांगोला- कोरोनाबाधित मयत झालेल्या व्यक्तीच्या शरीराजवळ मृताचे नातेवाईक देखील येण्यास धजत नव्हते. अशा वेळी रात्री-अपरात्री दहन विधी करताना आम्ही माणुसकी हा धर्म पाळला आहे.आज दिपकआबांना राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आमचा फेटा,पुष्प व बक्षीस रुपी मानधन देऊन सत्कार करीत आम्ही केलेल्या कार्याची दखल घेतली याचा अभिमान वाटतो. सोमा बनसोडे - न.पा. कर्मचारी

Post a Comment

0 Comments