google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! घराच्या गच्चीवर झोपलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Breaking News

ब्रेकिंग! घराच्या गच्चीवर झोपलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

.ब्रेकिंग! घराच्या गच्चीवर झोपलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून


मंगळवेढा शहरानजीक अकोला रोडवर आईसोबत राहणाऱ्या मंगल कुबेर नरळे ( वय ३५) या महिलेचा घराच्या गच्चीवर डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केल्याची घटना बुधवार ९ जून २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.मंगळवेढा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे अकोला रोडवर असणाऱ्या आपल्या घरात फिर्यादी चंदाबाई कुबेर नरळे ( वय ५५) व त्यांची मयत मुलगी मंगल कुबेर नरळे या दोघी मिळून घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या.अचानक आई चंदाबाई यांच्या पोटात कळ मारू लागल्याने त्या खाली शौचास आल्या. मुलगी मंगल गच्चीवर एकट्या झोपल्या होत्या, तेव्हा आई शौचालयात असताना त्यांना कशाचा तरी आवाज आल्याने त्या गच्चीवर गेल्या त्या वेळेला मुलगी मंगल हिचा अज्ञात कारणावरून तिच्या डोक्यात दगड घालून अज्ञात इसमाने खून केल्याचे निदर्शनास आले.आई चंदाबाई नरळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .सदर गुन्ह्याचा तपास सपोनि भगवान बुरसे करीत आहेत.खुनाचा लवकरच उलगडा या खुनाचा लवकरच उलगडा होईल यातील आरोपीला दोन दिवसात गजाआड करू – जोतिराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक मंगळवेढा

Post a Comment

0 Comments