महाराष्ट्रातही मिळणार दिवाळीपर्यंत मोफत धान्य
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व राज्यांतील आर्थिक व्यवहारांवर प्रतिबंध लागू केले होते.मात्र त्याचवेळी देशातील सुमारे ८० कोटी गरीबांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ अमलात आणली. याअंतर्गत मे आणि जून २०२१ या महिन्यात मोफत रेशन वाटप करण्यात आले.महाराष्ट्राच्या महाव्यवस्थापिका के. पी. आशा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खाद्य महामंडळाने महामारीच्या काळात संपूर्ण राज्यात या योजनेअंतर्गत सुमारे २,९८,२९३ टन गहू तसेच १,४९,०९९ टन तांदळाचे मोफत वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला दिले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दीपावलीपर्यंत गरीबांना मोफत रेशन वाटप करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातही अशा पद्धतीने रेशनचे वाटप केले जाणार आहे.
0 Comments