चांगली बातमी! सोलापूर जिल्ह्यामधील कोरोनाची साथ ओसरू लागली; मृत व रुग्णांची संख्या झाली कमी
दोन महिन्यांपूर्वी 50-60 मृत्यू आणि दोन हजारांवर दररोज कोरोना रुग्ण आढळत होते. परंतु, गेल्या महिन्यापासून शहरासह जिल्ह्यातील मृत व रुग्णांची संख्या कमी झाल्याने साथ ओसरू लागल्याची चिन्हे आहेत.मंगळवारी शहरात 1, तर ग्रामीण भागात 8 अशा 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नव्याने 344 रुग्णांची भर पडली आहे. ही गेल्या दोन महिन्यांतील सर्वात नीचांकी संख्या आहे. एकूण 472 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर 177 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.बुधवारी ग्रामीण भागातील 6 हजार 769 जणांची तपासणी झाली. त्यापैकी 6 हजार 439 हजार अहवाल निगेटिव्ह, तर 330 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.451 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहरातील 2 हजार 260 जणांची कोरोना तपासणी झाली. त्यापैकी 2 हजार 246 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 14 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनामुक्त होऊन 21 जण घरी गेले.आज तागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 30 हजार 293 जण, तर शहरातील 28 हजार 459 जण असे एकूण 1 लाख 58 हजार 752 जण कोरोनाबाधित आढळले.त्यापैकी ग्रामीण भागातील 2 हजार 902, तर शहरातील 1 हजार 395 अशा 4 हजार 297 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 2 हजार 504, तर शहरातील 162 अशा एकूण 2 हजार 666 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 887 जण आणि शहरातील 26 हजार 902, असे 1 लाख 51 हजार 789 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
0 Comments