google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कारागृहातील २५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

Breaking News

सांगोला कारागृहातील २५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

 सांगोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनातर्फे सांगोला येथील दुय्यम कारागृहातील ६० पैकी तब्बल २७ कैदी तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . कोरोनाबाधित २७ कैद्यांवर कमलापूर येथील सिंहगड कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले ,


सांगोला येथील दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यात बंदी असलेल्या ६० पैकी आठ कैद्यांना ७ मे रोजी दुपारी अचानक त्रास होऊ लागल्याने सांगोला ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी केली . यामध्ये तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले . त्यामुळे उर्वरित ५२ कैद्यांची कोरोना चाचणी केली . त्यामध्ये २२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधित कैद्यांची संख्या २७ झाली आहे.सध्या विविध गुन्ह्यातील ६० कैद्यांची चार बराकमध्ये गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला असण्याची शक्यता वर्तवलीजात आहे . २७ मार्च रोजी याच कारागृहातील तब्बल २४ कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती . त्यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील , प्रांताधिकारी उदयसिंह भोसले , पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर , तहसीलदार अभिजित पाटील , डॉ . उत्तम फुले यांनी कारागृहाला भेट देऊन सर्व कैद्यांची तपासणी करून घेतली होती . त्यानंतर दीड महिन्याने पुन्हा याच कारागृहातील २५ कैदी पॉझिटिव्ह सापडल्याने कैद्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे .

Post a Comment

0 Comments