मंगळवेढा : अंगावर वीज पडून एका मुलीचा मृत्यू
मंगळवेढा येथील जुना मारापूर रोड, मेटकरी वस्ती परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वीज पडून मेघा विठ्ठल मेटकरी (वय 13) या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मेटकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी 4 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाळा सुरवात झाली. दरम्यान मयत मेघा मेटकरी ही पाऊस उघडला आहे म्हणून घराबाहेर येऊन थांबली होती. पाऊस बारीक सुरूच होता,तेवढ्यात अचानक मेघाच्या अंगावर वीज पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. मेघा ही सातवी वर्गात शिकत होती. तिच्या पश्चात एक भाऊ,दोन बहिणी आई वडील आजी आजोबा असा परिवार आहे.
0 Comments