सांगोल्यात गारांचा पाऊस , वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली खरीप हंगाम पूर्व हा वळवाचा पाऊस शेतीला पोषक मानला जात आहे . मात्र , तालुक्यातील दक्षिण पश्चिम व उत्तरेकडील काही भागांत ...खरीप हंगाम पूर्व हा वळवाचा पाऊस शेतीला पोषक मानला जात आहे .
मात्र , तालुक्यातील दक्षिण पश्चिम व उत्तरेकडील काही भागांत जोरदार वादळी वारे वाहत होते . काही ठिकाणी । तुरळक पाऊस झाल्याचे सांगण्यात आले . सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरात बसून आहेत . त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होत . त्यात दुपारनंतर जोरदार वादळी वारे वाहत मेघगर्जनेसह पाऊस झाला . दोन दिवसांपूर्वी अचकदाणी , कटफळ या भागाला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसून घरावरील पत्रे उडून गेले . महावितरण कंपनीचे विजेच्या खांबावरील तारा तुटून नुकसान झाले होते , दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कामे उरकून खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे उरकून उसंती घेतली सुरू आहेत . रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन दुपारनंतर अचानक पावसास सुरुवात झाली . सुमार अधा ते पाऊण तास मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले . वळवाच्या पावसात बाळगोपाळांनी भिजून आनंद घेतला तर उकाड्याने हैराण झालेल्या आबालवृद्धांना थंडगार हवेमुळे दिलासाही मिळाला . या पावसामुळे कडवळ , उन्हाळी भुईमूग , डाळिंबासह फळबागांना दिलासा मिळाला आहे . वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली रविवारी सांगोला शहर वाढेगाव , राजापूर , आलेगाव , मेडशिंगी , वाणीचिंचाळे , वाकी घेरडी , तरंगेवाडी , घेरडी , हंगिरगे , पारे , नराळे डिकसळ , शिरभावी , धायटी , चिंचोली या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली . वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून व वृक्ष उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले तसे व केशर , गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविला जात आहे .
0 Comments