कमलापूर येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये जेवणाअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत होते . येथील रुग्णांना दर्जेदार , सकस आहार मिळण्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.संबंधित कोविड सेंटरमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थेची चौकशी केली असता या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे
. कोरोना साथीने मागील एक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून या साथीला रोखण्यासाठी आरोग्य विभाग , पोलीस प्रशासन , सामाजिक संस्था आदी दिवसरात्र झटत आहेत . शासनाने लाखो रुपये खर्च करून कोविड सेंटर उभारले आहेत . मात्र , या कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणारे जेवण , चहा , नाष्टा आदींचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे . प्रत्येक रुग्णांबरोबर चर्चा केली असता या ठिकाणी दररोज नियमित शौचालय स्वच्छ करीत नसल्याचा तक्रारी आल्या . त्याच बरोबर दोन्ही वेळा पिण्यासाठी गरम पाणी मिळत नसल्याचे येथील रुग्ण सांगत होते . तसेच प्रत्येकी एक लिटर गरम पाण्यासाठी पाच रुपये आकारले जातात . ज्यांच्याकडे पैसे नाहीत अश्या रुग्णांना गरम पाणी दिले जात नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांमधून सांगण्यात येत आहे . कोविड सेंटर मधील रुग्णांशी बातचीत केल्यानंतर असे आढळून आले की , नाष्ट्यात पाला पाचोळा असतो , भात कच्चा , काढा देण्याच्यानावाखाली कोरा चहा दिला जातो , तो ही अगदी कमी . तरीही अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाही . तहसीलदार अभिजीत पाटील यांचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर बेतले आहे . शिळी चपाती गरम करून रुग्णांना दिली जाते . दुपारी दीड नंतर जेवण मिळते , ते एक वाजेपूर्वी मिळावे , अशी मागणी करण्यात आली आहे . निकृष्ट जेवणाचा प्रकार तातडीने | थांबवावा , असे येथील रुग्णांचे म्हणणे आहे . या प्रकारामुळे इतर रुग्णांमध्येही संताप आहे .
कोविड सेंटर मध्ये रुग्णांना हवी ती सेवा दिली जात नाही , शिळे अन्न , अर्धे शिजवलेले अन्न यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत , तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या जीवाचा विचार करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी . दिलीप बनसोडे . नाझरे ग्रामपंचायत सदस्य , नाझरे .
0 Comments