ठाणे : गेल्या सव्वावर्षापासून महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे बंद आहेत . त्यामुळे लोक कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे .
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील लोककलावंतांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून कलावंतांच्या मदतीसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव लवकरच करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली . महाराष्ट्रातील कलावंतांच्या सुमारे ७५० रंगमंच कामगार आहेत . त्यांना दरमहा किमान ५ हजारांची आर्थिक मदत शासनाने द्यावी , ही मदत केवळ आता कोरोनाच्या काळात नाही , तर नाटके रंगमंचावर आल्यावरही ती पुन्हा सुस्थितीत येईपर्यंत शासनाने ही मदत द्यावी , अशी मागणी केली . - रत्नकांत जगताप , प्रवक्ते , रंगमंच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना समवेत सोमवारी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला . राज्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नियमावली तयार करण्यात येऊन यानंतर चित्रीकरण आणि लोककलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात येईल , असे सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी स्पष्ट केले . फड मालकांना अनुदान , लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी , लोककलावंतांना रोख मदत , चित्रपटांना सरसकट अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही , लोककलावंतांची नोंदणी , शासनामार्फत देण्यात येणारे अनुदान वेळेवर प्राप्त होणे , कलाकारांसाठी ओळखपत्र , असे मुद्दे यावेळी मांडले गेले .
0 Comments