google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तिसंगीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद करणेसाठी ६ हजार लाच घेताना रंगेहाथ पकडले

Breaking News

तिसंगीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद करणेसाठी ६ हजार लाच घेताना रंगेहाथ पकडले

 तिसंगीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद करणेसाठी  ६ हजार लाच घेताना रंगेहाथ पकडले

कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील तलाठी रामू पांडुरंग कोरे (वय 43) यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावाने केलेल्या बक्षीस पत्राची नोंद अधिकार पत्रकात धरण्यासाठी कोरे यांनी ही लाच स्वीकारली.याप्रकरणी कोरे यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावाने बक्षीसपत्र केले होते. या बक्षीस पत्राची नोंद अधिकार पत्रकात धरण्यासाठी तक्रारदार हे तलाठी कोरे यांच्याकडे हेलपाटे मारत होते. अनेक हेलपाटे मारूनही कोरे यांनी तक्रारदार यांचे काम केले नव्हते अखेर तलाठी कोरे यांनी तक्रारदार यांना सदर कामासाठी 9 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.याबाबत तक्रारदार यांनी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवार दिवसभर या विभागाने सापळा लावून या तक्रारीची पडताळणी केली. यावेळी चर्चेअंती तलाठी कोरे यांनी तक्रारदाराला 6 हजार रुपये लाच मागितल्याने स्पष्ट झाले. (मंगळवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा तलाठी कोरे यांच्यासाठी सापळा लावला.तक्रारदाराला पैसे घेऊन कोरे यांच्याकडे पाठवले. यावेळी तक्रारदाराकडून 6 हजार रुपये स्वीकारताना कोरे यांच्यावर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी झडप घातली.या कारवाईमुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments