देशी दारु म्हटलं कि , डोळ्यासमोर दिसतात ते झुलानारे आणि धिंगाणा घालणारे लोकं , हि दारु सरकारने कशालाच बनवली असेल याचा उपयोग तर नाही परंतु तोटेच जास्त प्रमाणात असल्याचे बोलले जाते . परंतु जीवनात कधी कोणत्या गोष्टीला महत्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही .
कोरोना महामारीने सध्या संगळ्यांचीच झोप उडाली असतानाच सोशल मीडियातून ' देशी दारु ' ही योग्य प्रमाणात वापरल्यास कोरोनावर ती चांगल्या प्रकारे काम करते . याचे उदाहरणे देउन ५० च्या वर कोरोना पेशंट बरे केल्याचे शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील सिताई हॉस्पिटलचे डॉ अरुण भिसे यांनी यात पुराव्यानिशी सांगितले आहे . शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील काही गृपवर सध्या ' देशी दारु ' कोरोनावर उपयुक्त ठरत असल्याचा मेसेज पहायला मिळत आहे . या व्हायरल कोरोनाला निष्क्रिय करणारा फॉर्म्युला अल्कोहोल व DRDO ने ज्या औषधाला कोरानासाठी मंजुरी दिली ते Deoxy D - Glocose यांच्या केमिकल फॉर्मुल्यातील साधर्म्य आश्चर्य चकित करणारे आहे.तसेच कोरोना व्हायरस वरील लिपीड चे आवरण फक्त आणि फक्त अल्कोहोल किंवा साबणच निष्क्रिय करु शकते . मेसेज मध्ये डॉ . अरुण भिसे ही माहिती देताना सांगितले आहे . या अनुभवाचे सर्व श्रेय हे अंतरवाली येथील माझ्या एका अडाणी पेशंटला व ' अल्कोबॉट ' नावाचे साधे उपकरण बनवणारे डॉ . आर के संघवी यांना देत असल्याचे डॉक्टर भिसे यांनी सांगितले . गेल्या एप्रिल महिन्यात अंतरवाली येथील एका ६० वर्षीय महिला पेशंटला कोरोनाने ग्रासले तीचा स्कोर जास्त आणि परिस्थिती गंभिर असल्याने शेवगांव येथे तीला डमिट करुन न घेता नगरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला परंतु बेड उपलब्ध न झाल्याने तीला घरी आणण्यात आले , सुरु असलेल्या औषधोपचाराचा काहीही परिणाम जाणवत नसल्याने तीच्यावर घरगुती काढे वाफ देण्यात आली तरीही बरे न वाटल्याने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तीला ६० एम एल मात्रेत ' देशी दारु ' देण्यात आली आणि आश्चर्य , लागत असलेला दम कमी होऊन तीला जेवण देखील गेले . या अनुभवातुन डॉ भिसे यानी मनवतेचा दृष्टीकोण समोर ठेवत आणि पेशंटचा जिव महत्वाचा असल्याने त्यांनी बेड न मिळालेल्या ५० कोरोना बाधितावर शासकीय तज्ञ समितीने ठरवून दिलेल्या गाईडलाईन नुसार उपचार सुरू केले व सोबत पेशंटला ३० एम एल ' देशी दारू ' सकाळ / संध्याकाळी पाण्यासोबत पेशंटच्या संमतीने दिल्याने ते कोरोनातुन मुक्त झाले आहेत .
0 Comments