Breaking News

महुद परिसरात अवैध वाळू उपसा, दारू विक्री जोमाने ; पोलीस, महसूल व उत्पादन शुल्क विभागाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष !

 महुद परिसरात अवैध वाळू उपसा, दारू विक्री जोमाने ; पोलीस, महसूल व उत्पादन शुल्क विभागाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष ! 

सांगोला तालुक्यातील महुद परिसरात लॉकडाऊनच्या काळात महसूल, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचारी यांच्याशी संगणमत करून अवैध वाळू उपसा व दारू विक्री जोमाने सुरू आहे. प्रशासनातील या कर्मचा-यांच्या मर्जीतील अवैध वाळू उपसा करणा-या व दारु विक्री करणा-यांना कर्मचा-यांकडून पाठबळ मिळत आहे. त्यामुळे या परिसरात अवैध धंदे दिवसा ढवळ्या राजरोसपणे सुरू आहेत. या परिसरातील काही ठराविक लोक हा अवैध व्यावसाय करण्यासाठी प्रशासनातील काही कर्मचारी यांचेशी लगट करून आर्थिक देवाणघेवाण करून हा व्यवसाय करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. महसूल, पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी हे या राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध व्यावसायावर कारवाई करण्यास जाणीव पुर्वक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी महुद परिसरात प्रशासनातील काही कर्मचारी यांच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या अवैध व्यावसायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments