google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर आर्थिक संकटातील तरुणाने कुटुंबाला संपवले , स्वत : केली आत्महत्या

Breaking News

सोलापूर आर्थिक संकटातील तरुणाने कुटुंबाला संपवले , स्वत : केली आत्महत्या

 आर्थिक संकटातील तरुणाने कुटुंबाला संपवले , स्वत : केली आत्महत्या  बक्षी हिप्परगे ( ता . दक्षिण सोलापूर ) येथील हणमंत द - याप्पा शिंदे ( वय ४० ) हा गेल्या अनेक वर्षांपासून लोणी काळभोर नजीक कदम वस्ती येथे कुटुंबासह राहतो .


बदली चालक म्हणून तो काम करतो . लॉकडॉऊनमुळे वर्षभरात त्याला काम मिळाले नाही . कर्जाचा डोंगर वाढत गेला . तीन मुले आणि पत्नी यांचा सांभाळ करणे अडचणीचे झाले . त्यातून पती - पत्नीचे रोज वाद होत राहिले . रविवारी वादाचे रूपांतर भांडणात झाले . त्याने सकाळी झोपलेल्या पत्नी प्रज्ञा ( वय २८ ) हिच्या गळ्यावर उशी दाबल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला . जवळच १४ महिन्याचे बाळ खेळत होते . त्याचा सुरीने गळा कापला . त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन दोरीने गळफास घेऊन स्वत : आत्महत्या केली . दोन मोठी मुले घराबाहेर खेळत असल्याने ती मात्र वाचली . लोणीकाळभोर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तिघांचे प्रेत ताब्यात घेतले . रात्री उशिराने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

Post a Comment

0 Comments