लहान मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्यमंत्र्यांनी उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल; तिसर्या लाटेशी लढण्यास सरकार सज्ज
महाराष्ट्र : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होऊ शकेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेसोबत चार हात करण्यासाठी राज्य सरकार सज्ज झालं असून राज्यात बालरोगचिकित्सा तज्ञ (पीडियाट्रिक) यांची टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
0 Comments