पोलीस हवालदार पाठोपाठ पो. नि.च्या आईचा खून
पुण्यातील खुनाचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. पोलिस हवालदाराच्या खुनाची घटना ताजी असतानाच, वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भाजीमंडई जवळ असलेल्या मैदानाशेजारी सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या आईचा खून झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. शाबाई अरुण शेलार (वय.65, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला हा प्रकार निदर्शनास आला. डोक्यात रॉड मारून त्यांचा खून करण्यात आला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. चार दिवसांत पुण्यात खूनाची पाचवी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सातारा पोलिस दलालीत सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या त्या आई होत्या.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाबाई यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या दुकानातच वास्तव्य करत होत्या. सकाळी भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्याने त्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान शेलार यांचा खून कोणत्या कारणातून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
0 Comments