Breaking News

दुर्दैवी घटना! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात माण नदीतील विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

 दुर्दैवी घटना! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात माण नदीतील विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू


मंगळवेढा तालुक्यातील ढवळस माण नदीतील विहिरीत पाण्यात बुडून विश्वनाथ रंगनाथ पुजारी ( वय ३२ ) व सागर बापू मस्के ( वय २२ रा.ढवळस ) हे दोघेजण मयत झाले आहेत.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि.१३ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजण्यापुर्वी माण नदीतील जयसिंग दादासाहेब हेंबाडे यांच्या विहिरीत विश्वनाथ रंगनाथ पुजारी हा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर मयताचा भाऊ मोहन रंगनाथ पुजारी यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे


.सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो.ना.सुरवसे हे करीत आहेत.तसेच माण नदीपात्रातील जयसिंग दादासाहेब हेंबाडे यांच्या विहिरीत सागर बापू मस्के ( वय २२ रा.ढवळस ) हा दि .१३ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास विहिरीत बुडाल्याने मरण पावला.याची खबर लक्ष्मण बापू मस्के यांनी दिल्याने मंगळवेढा पोलीसांनी सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास पो.हे.कॉ. गयकवाड हे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments