Breaking News

जिल्ह्यातील पेट्रोल पंप लॉक, अत्यावश्यक सेवा धारकांनाच मिळणार पेट्रोल-डिझेल,आदेश

 जिल्ह्यातील पेट्रोल पंप लॉक, अत्यावश्यक सेवा धारकांनाच मिळणार पेट्रोल-डिझेल,आदेश


लागू,सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा कडक  लॉक डाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. परंतु या लॉकडाउन मध्ये ही काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोना संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे



त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आता एक नवीन आदेश काढला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंप धारकांना पेट्रोल डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली असून  यापुढे पेट्रोल पंपांवर फक्त अत्यावश्यक सेवा धारकांनाच त्या ठिकाणी ओळख पत्र दाखवल्यावर पेट्रोल-डिझेल मिळणार आहे इतरांना मात्र त्याठिकाणी पेट्रोल-डिझेल कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही.जिल्ह्यामध्ये  रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात पोट निवडणुकीनंतर कोरोणा रुग्णसंख्येचा मोठा स्फोट झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने विविध नियम लागू करून कोरोना नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु काही केल्या कोरोणा आटोक्यात येत नसल्याचे पाहावयास मिळत आहे, दुसऱ्यांदा दिनांक 21 मे पासून ते 1 जून पर्यंत कडक लॉक डाऊन करण्यात आला आहे. परंतु या काळामध्ये अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोना संसर्ग  वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल पंपावर मोठी गर्दी दिसत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याकरिता  जिल्हाधिकाऱ्यांनी दि.21 मे रोजी आता एक नवा आदेश जारी केला आहे. पेट्रोल डिझेल पंप धारकांना अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल-डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. पेट्रोल डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने ,शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने ,प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, मीडियाचे कर्मचारी, मालवाहतूक करणारी वाहने, इत्यादी साठीच सुरू राहील, मात्र यांनाही ओळखपत्र दाखवणे आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून  निर्देशित करण्यात आले आहेत. त्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी एक पत्र जारी केले असून पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना माहितीसाठी व पुढील कारवाईसाठी पाठवले असून आदेशाची कड़क व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनी दु चाकी,चार चाकीवर  घराबाहेर पडू नये पडल्यास मात्र पेट्रोल,डिझेल विना तारांबळ होणार हे मात्र निश्चित झाले आहे.

Post a Comment

0 Comments