google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी मंत्री व भाजपाचे नेते राम शिंदे यांनी बुधवार ? ( ता . 7 ) एप्रिल रोजी माजी आमदार डॉ . गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली .

Breaking News

माजी मंत्री व भाजपाचे नेते राम शिंदे यांनी बुधवार ? ( ता . 7 ) एप्रिल रोजी माजी आमदार डॉ . गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली .

 सांगोला : माजी मंत्री व भाजपाचे नेते राम शिंदे यांनी बुधवार ? ( ता . 7 ) एप्रिल रोजी माजी आमदार डॉ . गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली .


गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी येणाऱ्या विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ? भेटीने राजकीय चर्चा झाल्याची मात्र रंगू लागल्या आहेत . या भेटीवेळी भाई गणपतराव देशमुख यांनी राम शिंदे यांचे स्वागत केले . या भेटीचे फोटो सायंकाळनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क काढण्यात येत आहे . गेल्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांनी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार गणपतराव देशमुख यांची भेट घेतली होती . नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व शिवसेनेची युती झाल्याचे जाहीर केल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह गणपतराव देशमुख यांचीची भेट घेतली होती या भेटीवेळी ही गणपतराव देशमख यांच्या तब्येतीचीविचारपूस करण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते . या वाढत्या भेटीगाठीमुळे आमदार गणपतराव देशमुख यांचे निवासस्थान केंद्रबिंदू झाले असले तरी याबाबत राजकीय चर्चांना मात्र उधान आले आहे .

Post a Comment

0 Comments