चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पुढाकाराने भाजीपाला विक्रेत्यांना मिळाला न्याय
सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सांगोला शहरातील आठवडा बाजार येथे रोज सकाळी होणाऱ्या भाजीपालाच्या लिलावाची जागा बदलून ती इतर मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. यामुळे व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ, भाजीपाला विक्रेत्यांनी येणाऱ्या अडचणींची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची भेट घेतली होती.
यावर गुरुवारी चेतनसिंह केदार-सावंत यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याशी चर्चा करून समाधानकारक तोडगा काढत अडते, शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांची समस्या दूर करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सांगोला नगरपालिकेने शहरातील आठवडा बाजारात होणारे भाजीपाला लिलाव इतर मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या निर्णयामुळे मात्र अडते, व्यापारी, शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यावर मार्ग काढण्यासाठी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ, भाजीपाला विक्रेत्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची भेट घेतली. यावर चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. गुरुवार 8 एप्रिल रोजी सकाळी 7 च्या सुमारास चेतनसिंह केदार-सावंत व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रत्यक्ष आठवडा बाजारात जाऊन अडचणी संदर्भात चर्चा केली. यावेळी अडते, शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांनी शासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन करण्याचे आश्वासन दिले. सांगोला शहरातील आठवडा बाजार येथील जागेत शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल व्यापारी, शेतकऱ्यांनी
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचे आभार मानले आहेत.
0 Comments