google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज: ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली . मा . मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे .

Breaking News

ब्रेकिंग न्यूज: ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली . मा . मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे .

 राज्यभरातील सर्व दुकाने येत्या सोमवारपासून पुन्हा उघडण्याचा ठराव करण्यात आला आहे . राज्यभरातील व्यापारी संघटनांची बैठक आज झाली . त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे . ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली .


मा . मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे . त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली . महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अॅग्रिकल्चर तर्फे आज दि . ८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ६ वाजता " ब्रेक द चेन व व्यापार बंद " या विषयावर चर्चा निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची झूम अॅपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली .सुरुवातीला चेंबरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सर्वांचे स्वागत करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे २ दिवस वाट बघावी असे सांगितले आहे . याबाबत आपण सर्वांनी मते मांडावी असे सांगितले . बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून गेल्या ४ दिवस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत तसेच सरकारशी संपर्क करून आहोत . सर्वांच्या भुमीका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा आढावा घेतला व सर्वांनी आजच्या बैठकीत आपल्या संघटनेची भूमिका मांडावी असे सांगितले . बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री . ललित गांधी , उपाध्यक्षा सौ . शुभांगी तिरोडकर , उपाध्यक्ष श्री . अनिलकुमार लोढा , नाशिक शाखा चेअरमन श्री . दादलीका , पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका , अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री . विनोद कलंत्री , कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री . संजय शेटे , सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी ,, चेंबर ऑफ मराठवाडा , इंडस्ट्रीज अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री . कमलेश धूत , पूना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष श्री . पोपटलाल ओस्तवाल , चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष श्री . हर्षवर्धन संघवी , नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री . अश्विन मेहाडिया , चंद्रपूर जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्री . रामजीवन परमार , नाशिक घाऊक व्यापारी किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती , औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे , हार्डवेअर अँन्ड पेन्ट्स मर्चेट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार लोढा , येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री . योगेश सोनवणे , श्री . मोहन गुरुनानी , नाशिक मोटार मर्चन्ट असोसिएशनचे श्री . कैलाश चावला , श्री . हर्षवर्धन संघवी , सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे असोसिएशनचे श्री . ओंकारनाथ भंडारी , टिम्बर फेडरेशन , जळगाव व्यापारी महासंघ , चंद्रपूर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सदानंद खत्री , स्टील चेंबर , सिमेंट स्टोकिस्ट असोसिएशन , तुर्भे व्यापारी असोसिएशन , पालघर वसई तारापूर असोसिएशन , कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील , व्हीटीपी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल शहा चिपळूण इंडस्ट्री असोसिएशन अध्यक्ष अविनाश अशोक , अंबरनाथ असोसिएशनच्या पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सरकारच्या ब्रेक द चेन विषयावर सरकारच्या निर्णयाची २ दिवस वाट बघावी असे मत मांडली . शेवटी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष गांधी यांनी आभार मानले . बैठकीस कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात , श्री . अजित सुराणा , प्रवीण पगारिया , मुस्ताक शेख , महाराष्ट्र चेंबर प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे , सचिव विनी दत्ता आदीसह ३०० व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Post a Comment

0 Comments