राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक आणि माहितीचा अधिकार क्षेत्रात काम करणारे रोहिदास दातीर रोहिदास राधुजी दातीर ( वय ४८ , रा . उंडे वस्ती , राहुरी ) यांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली . हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले , तरी दातीर माहितीचा अधिकार वापरून काही प्रकरणांचा पाठपुरावा करीत होते , त्यातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे .
संशयित आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले . दातीर यांच्या पत्नी सविता यांनी फिर्याद दिली आहे . त्यानुसार पोलिसांनीप्रथम अपहरणाचा आणि मृतदेह सापडल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला . या प्रकरणाची माहिती अशी , मंगळवारी ( ६ एप्रिल ) दुपारी दातीर दुचाकीवरून जात असताना मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांचे अपहरण केले . पोलिसांना घटनास्थळावर दातीर यांची चप्पल आणि दुचाकी सापडली . परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता दातीर यांना ज्या गाडीतून नेण्यात आले , तिचा क्रमांक मिळाला . ते वाहन कान्हू गंगाराम मोरे ( रा . वांबोरी ) यांच्या मालकीचे आहे . त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला . दरम्यान , रात्री दातीर यांचा मृतदेह राहुरीतील कॉलेज रोडवर आढळून आला .
0 Comments