मुके प्राणी झाले ६८ वर्षाच्या वृध्दाच्या वासनेचे शिकार मुंबई – इंटरनेट च्या जमान्यात ‘ दुनिया मुट्ठी में ‘ झाली असली आणि हजारो लाखो किमी पोहचणे सहज शक्य झाले असले तरी त्याचे ईतर गोष्टी प्रमाणे चांगल्या सोबत वाईट परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. इंटरनेट मुळे तुमच्या ज्ञानात भर पडत असली तरी त्यावर उपलब्ध होणाऱ्या अश्लील साहित्यामुळे समाजात लैंगिक विकृती देखील वाढत आहे.
त्यामुळे अनैसर्गिक अत्याचार आणि जनावरांसोबत सेक्स सारख्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईच्या अंधेरी येथे घडली आहे. येथील जुहू गल्लीत राहणाऱ्या अहमद शहा ने एक दोन नव्हे तर ३० कुत्र्यांवर बलात्कार केला आहे. एका व्यक्तीने त्याला हा किळसवाणा प्रकार करतांना पाहिल्या हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने ही माहिती ‘ बॉम्बे ऍनिमल राईट्स ‘ नावाच्या स्वयंसेवी संस्थेकडे पाठवली होती. पुरावा म्हणून त्याने डिसेंबर २०२०चा व्हिडीओ देखील पाठवला होता. प्राणी हक्क संघटनेचे विजय मोहनाणी यांना ही बाब कळल्यावर त्यांनी डीएनए नगर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली होती. विजय मोहनानी यांच्या तक्रारीवरून अहमद शहा यांच्या विरोधात कलम ३७७(अनैसर्गिक कृत्य) ४२९ ( एखाद्या प्राण्यांची हत्या करणे किंवा त्याला अपंग बनवणे ), आणि कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद शहा याला असे कृत्य करण्याची सवय असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून त्याला लोकांनी समज दिली होती असे देखील बोलल्या जात आहे.अहमद कुत्रे मांजरीला खायचे आमिष दाखवून करत होता घाणेरडे कृत्य- परिसरातील नागरिकांनुसार अहमद शहा हा कुत्र्या मांजरींना खायचे आमिष दाखवून बोलावीत होता.आणि त्यानंतर असे घाणेरडे कृत्य करीत होता. हे प्रकारण उजेडात आल्या नंतर कुत्र्यांना न्याय मिळावा अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे


0 Comments