वन्यप्राण्यांसाठी ४५ ठिकाणी पाणवठे तयार पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे . रस्ता ओलांडून धावताना अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे . या ...पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे . रस्ता ओलांडून धावताना अनेक प्राण्यांना जीव गमवावालागत आहे .
या प्रकारांना आळा घालून जंगलातच पाण्याची सोय व्हावी , यासाठी सांगोला वनविभागाकडून तयार केलेल्या पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडल्यामुळे प्राण्यांची तहान भागविली जात आहे . तालुक्यातील राजुरी , घेरडी , कोळा , पाचेगाव , कटफळ , मेडशिंगी , बागलवाडी , लोटेवाडी , य . मंगेवाडी , डिकसळ , पारे , गुणापवाडी , ह . मंगेवाडी , कटफळ , चिकमहूद , शिरभावी या ठिकाणी असलेल्या वनविभागाच्या ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात ४५ पाणवठे तयार केले आहेत . एका पाणवठ्यात ५ हजार लीटर पाणी मावेल , अशी त्याची रचना करून त्यात टँकरद्वारे पाणी सोडले जाते . दरम्यान , पाणवठे तयार करताना वन्य प्राण्यांना सहजपणे पाणी पिता येईल , अशी बशीच्या आकाराची रचना केल्यामुळे त्यात प्राण्यांचा बुडून मृत्यू होणार नाही , याचीही काळजी घेतली आहे .बुडून मृत्यू होणार नाही , याचीही काळजी घेतली आहे . वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ तालुक्यातील वनविभागात मोर , तरस , हरीण , चिंकारा , कोल्हा , लांडगा , ससा , आदी वन्यप्राण्यांची संख्या वाढल्यामुळे जनावरांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत . तसेच वनांशेजारी असलेल्या शेतातील गवत जाळल्याने त्याची झळ फॉरेस्टमधील गवताला लागत आहे . त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका वाढल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी सांगितले .
0 Comments