तालुक्यातील गुन्हेगार गुंडांच्या तडीपारीची यादी तयार, गुन्हेगारांनो सावधान...! : पो.नि. निंबाळकर सांगोला पोलीसांनी पुन्हा एकदा २ गुन्हेगारांना केले तडीपार सांगोला व मुलींची छेडछाड, विनयभंग, स्वतःजवळ धारदार हत्यार बाळगणे, हाणामारी करणे तसेच वाळू चोरी करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यातील पाचेगाव येथील विजय प्रकाश घोडके व वासुद येथील सचिन आनंदा केदार या २ गुन्हेगारांना सांगोला पोलीसांनी गुरुवार दिनांक १८ मार्च रोजी सोलापूर व सांगली या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असुन आणखीन गुन्हेगार गुंडांची यादी तयार झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली
.सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील पाचेगाव ब्रु ता.सांगोला येथील विजय प्रकाश घोडके याने महिलांची,मुलीची छेडछाड करून विनयंभग करणे, स्वताजवळ धारधार हत्यार बाळगलेले होते. व त्यांने मारामारीमध्ये मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असुन त्याच्यावर सन २०१६ पासुन आतापर्यंत ५ गुन्हे दाखल आहेत.त्यास वेळोवेळी गुन्हे न करणे बाबत समज देण्यात आला असुनही त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही म्हणून त्यास सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत ठेवल्यास आणखी गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याने व लोकाच्या जिवीतास धोका असल्याने त्याचा तडीपारचा प्रस्ताव परीविक्षाधिन सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साो सांगोला विभाग सांगोला श्री.अंकीत साहेब यांचेकडे पाठविषण्यात आला होता.
श्री.अंकीत साहेब यांनी शहानिशा करून त्यास सोलापुर व सांगली अशा २ जिल्हायातुन १ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.तसेच वासुद ता.सांगोला येथील सचिन आनंदा केदार हा गुन्हेगार असुन तो वाळुमाफिया आहे.वाळु चोरीचे गुन्हे केलेले असुन सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे,मारामारी,असे गंभीर प्रकारचे ५ गुन्हे केले आहेत.त्यास वेळोवेळी गुन्हे न करणे बाबत समज देण्यात आली असुन त्यांचे वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाहीत.यामुळे त्यास सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत ठेवल्यास आणखी गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याने व लोकाच्या जिवीतास धोका असल्याने त्याचा तडीपारचा प्रस्ताव परीविक्षाधिन सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साो सांगोला विभाग सांगोला श्री.अंकीत साहेब यांचेकडे पाठविण्यात आला होता. श्री.अंकीत साहेब यांनी शहानिशा करून त्यास सोलापुर जिल्हायातुन १ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिड महिन्यापुर्वी सांगोला पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला होता.आज जे गुंड तडीपार करीत आहोत.ते वाळुमाफिया, दंगा, मारामारी, जातीवाद करणे, महिलाचे व मुलीचे छेडछाड, विनयभंग करणे, आत्महत्तेस प्रवृत्त करणे, सरकारी मालत्तेवे नुकसान करणे, अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत. नागरीकाना आवाहन करण्यात येते की,वरील गुंड/ गुन्हेगार नामे विजय प्रकाश घोडके रा पाचेगाव ब्रु हा सोलापुर व सांगली जिल्हयात व सचिन आनंदा केदार रा.वासुद हा सोलापुर जिल्हयात दिसल्यास सांगोला पोलीस स्टेशनला माहीती दयावी.त्यांचेवर गुन्हे दाखल करून अटक करून जेलमध्ये पाठवले जाईल. आपण दिलेली माहीती गोपनीय ठेवली जाईल. सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगाराना पुन्हा एकदा इशारा करीत आहे की,जर वाळुमाफिया,दंगा,मारामारी, जातीवाद करणे, महिलाचे व मुलीचे छेडछाड, विनयभंग करणे, आत्महत्तेस प्रवृत्त करणे, सरकारी मालत्तेचे नुकसान करणे, सरकारी कर्मचा-यास मारहाण, दादागीरी, गुंडगिरी,सावकारकी, बळजबरी, चो-या ,दरोडा, जुगार, मटका, गुटखा, अवैध्य दारू विक्री अशा प्रकारचे जर गुन्हे केल्यास त्यांनासोडणार नाही. त्याना एम.पी.डी.ए,मोका,तडीपार केल्याशिवाय राहणार नाही असे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.
0 Comments