दिल्ली येथील तरुणीकडून मुंबईच्या तरुणाची ब्लॅकमेलिंग — व्हिडीओ कॉल मध्ये नग्न होऊन केला भलताच प्रकार
मुंबई – एखाद्या अनोळखी मुलीची फेसबुक वर फ्रेंडरिक्वेस्ट आली की मुलांना गगनात मावेनासा आनंद होतो. मुलगा मुलगी दिसायला कशी का असेना तो मागचा पुढचा कुठलाही विचार न करता लगेच तिची फ्रेंडरिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. तिने फेसबुक वर चॅटिंग करायला सुरुवात केली की त्याला आनंदाच्या भरात आभाळही ठेंगणे वाटते. तिने व्हाट्सएप नंबर किंवा दिन नंबर मागितला की मुलगा क्षणाचाही विलंब न करता ते समोरच्या मुलीला देऊन टाकतो. असाच नंबर देणे मुंबईच्या गौरव ला चांगलेच महागात पडले आहे. पण त्याने प्रसंगावधान राखत लगेच पोलिसात धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणा बद्दल अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी गौरव ला नेहा शर्मा नावाच्या मुलीची फेसबुक वर नेहा शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंडरिक्वेस्ट आली. गौरव ती ऍक्सेप्ट केली. त्यांनतर त्याचे फेसबुक वर चॅटिंग सुरू झाले. मुलीने हळूच त्याचा (गौरव) चा व्हाट्सएप नंबर मागून घेतला . त्यानंतर तिने त्याला व्हिडीओ कॉल करणे सुरू केले. हळूच तिने त्याला व्हिडीओ सेक्स ची मागणी केली. गौरव ने त्याला नकार दर्शविला. पण तिने त्यासाठी आग्रह धरला. याने काय हिणार ? असे गौरव ने नेहा ला विचारणा केल्यावर मला आनंद मिळेल असे नेहा ने गौरव ला सांगितले.जाहिरात सुरू ठेवण्यास स्क्रोल करा नेहा ने त्याला कॉल केला आणि ती व्हिडीओ कॉल वरच नेकेड झाली. तिने गौरव ला देखील तसेच करायला सांगीतले. तिच्या म्हणण्यावरून गौरव कपडे काढून नग्न झाला. नेहा ने या दरम्यान गौरव चा अश्लील व्हिडीओ बनवला.आणि तो त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवण्याची धमकी देत त्याच्या कडे ५१ हजार रुपयांची मागणी केली. गौरव ने यासाठी नकार दिल्यावर तो व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठवून दिला. यानंतर गौरव ने लगेच पोलिसात धाव घेतली. त्याने सरळ वाळूज पो.स्टे. गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी खंडणी मागीतल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वाळूज ठाण्याचे ठाणेदार राजेश कांबळे यांनी नागरिकांना असा प्रकार कोणासोबत घडला असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.तसेच कोणीही मुलीचा कॉल आल्यास त्याला लगेच प्रतिसाद देऊ नका. कारण युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्याला ब्लॅकमेल करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
0 Comments