google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी शनिवारी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आ . गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूर केली .

Breaking News

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी शनिवारी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आ . गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूर केली .

 सांगोला : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी शनिवारी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आ . गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूर केली . तरीही या भेटीमुळे सांगोल्यात उलट - सुटल चर्चा सुरू आहे . दोनच दिवसांपूर्वी आ . शहाजीबापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती .


त्यानंतर शनिवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली .ही भेट अनौपचारिक असली तरी अनेकजण आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी वेगळी नांदी तर नाही ना ! आगामी नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप आणि भाजप यांच्यात आघाडी झाली तर नवल वाटायला नको , अशीही चर्चा आहे . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष | चेतनसिंह केदार - सावंत , राणी माने , प्रशांत धनवजीर , आनंदा माने , दत्ताटापरे , आनंद फाटे , अभिजित नलवडे , छाया मेटकरी , अप्सरा ठोकळे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments