google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.. भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख सांगोला तहसीलदार श्री अभिजीत सावर्डेकर-पाटील यांना निवेदन देण्यात आले

Breaking News

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.. भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख सांगोला तहसीलदार श्री अभिजीत सावर्डेकर-पाटील यांना निवेदन देण्यात आले

सांगोला:- मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी एक ८ पानाचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे . महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील १७५० बार , हॉटेल व इतरांकडून प्रत्येकी २ ते ३ लाख याप्रमाणे दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते . या सोबतच अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये केले आहेत .


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हप्ते वसुलीमुळे राज्यातील पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे , जगात दोन नंबरवर असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे .

अशा यावरून एकच गोष्ट लक्षात येते की , आघाडी सरकार हे भ्रष्ट सरकार आहे . या भ्रष्ट सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्वरित राजीनामा घ्यावा . तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी , सांगोला तहसील श्री अभिजीत सावर्डे पाटील यांना  भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख व सांगोला तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थितीत निवेदन देण्यात आले  या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी , अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल .जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शहराध्यक्ष आनंद फाटे, नवनाथ पवार, मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, ओंकार कुलकर्णी, दीपक केदार, राहुल केदार, बिरा शिंगाडे, सिद्धेश्वर गाडे, समाधान केदार,नंदू मेटकरी, शरद गावडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments