google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आज सांगोला तालुक्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळले ; आरोग्य विभागातील एका कर्मचा-यालाही कोरोनाची लागण

Breaking News

आज सांगोला तालुक्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळले ; आरोग्य विभागातील एका कर्मचा-यालाही कोरोनाची लागण

 आज सांगोला तालुक्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळले ; आरोग्य विभागातील एका कर्मचा-यालाही कोरोनाची लागण


सांगोला तालुक्यात कोरोना बाधित पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. धक्कादायक म्हणजे सांगोला तालुका आरोग्य विभागातील एका कर्मचा-यालाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी सांगोला शहरात ७ तर ग्रामीण भागामध्ये महुद १, पाचेगाव खु .२ व यलमर मंगेवाडी या ठिकाणी १ अशा एकूण ११ जणांना कोरोना ची नव्याने लागण झाली आहे . कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने सुरु केलेल्या कोव्हिड सेंटरवर ८ रुग्ण दाखल झाले आहेत. कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून कोरोनाचे पुन्हा एकदा तालुक्यावर संकट आले आहे . सांगोला तालुक्यात कोरोना लस उपलब्ध झाली असली तरी रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढ होताना दिसत आहे . यामुळे प्रशासनाची पुन्हा डोकेदुखी वाढत आहे . कोरोना लसीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू असून ६० वर्षाच्या पुढील नागरिकांनी तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments