google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 क्षुल्लक भांडणातून पत्नीने स्वतःला पेटवून घेऊन पतीला मारली मिठी

Breaking News

क्षुल्लक भांडणातून पत्नीने स्वतःला पेटवून घेऊन पतीला मारली मिठी

 रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी-देऊळवाडी या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे.


मात्र हा प्रकार इथवरच थांबला नाही तर तिने त्यावेळी घराबाहेर काही अंतरावर उभा असणाऱ्या आपल्या नवऱ्याला देखील पेटलेल्या अवस्थेत मिठी मारली. या प्रकारात त्या महिलेचा 99 टक्के भाजून मृत्यू झाला तर तिचा नवरा देखील 60 टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे.ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. शिल्पा मंगेश निकम (वय 40) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून तिचा नवरा मंगेश बाळाराम निकम हा देखील गंभीररीत्या भाजल्याने त्याला खेडमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.दरम्यान या प्रकारामुळे गावात आणि संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नवरा बायकोची भांडणे इतक्या विकोपाला का आणि कशी गेली, पत्नीनेच स्वतःला पेटवून घेत आपल्या नवऱ्याला मिठी का मारली, दोघांमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपास खेड पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments