भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कोळे शाखेत इन्शुरन्स च्या नावाखाली नागरिकांची लूट होत असल्याने नागरिक हैराण !
कोळे / विशेष प्रतिनिधी:- भारतीय स्टेट बँक ही आत्यंत विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जाते. शासकीय व निमशासकीय व विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडणे आवश्यक य असते हे खाते उघडण्यासाठी संबंधित शाखा अधिकारी व कर्मचारी यांना पंधरा दिवसाचा वेळ लागतो आहे मुद्दामून गोरगरीब कष्टकरी लोकांना त्रास देणे हा मूळ हेतू आहे.व खाते उघडल्यानंतर हुकूमशाही सारखे इन्शुरन्स पॉलिसी उघडणे बंधनकारक आहे असे ठणकावून सांगितले जाते व पॉलिसी केल्या व्यतिरिक्त खाते सुरू करत नाहीत. या कोरोणा महामारी मुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट ओढवले आहे एखाद्या व्यक्तीस बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी काही कागदांची पूर्तता करावी लागते व तो ग्राहक सर्व कागदांची पूर्तता करून ही या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखाधीकारी कोळे हे ठराविक कर्ज मंजूर करून देतो त्यासाठी ठराविक रकमेची पॉलिसी करावे लागेल तुम्ही जर पॉलिसी नाही केली तर कर्ज मिळणार नाही असे ठणकावून सांगतो. त्यानंतर आम्ही काही ठिकाणी चौकशी केली व त्यातून आम्हाला अशी माहिती मिळाली की पॉलिसी वगैरे करणे असे काहीही नाही हा सर्व त्या शाखाधिकारी साहेबांचा मनमानी कारभार आहे.त्यांचावर संबंधित स्टेट बँकेचे वरचे अधिकारी काही कारवाई करणार का? सामान्य जनतेची होणारी लूट थांबणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोळे या ठिकाणी असलेला सुरक्षारक्षक आलेल्या सर्व ग्राहकांना अरेरावीची भाषा करतो व नाहक त्रास कसा होईल हे पाहतो... एका बँकेचा कस्टमरला का पैसे काढण्यासाठी दिवसभर बँकेच्या गॅलरी रांगेत उभा रहावे लागते. बाहेरच्या गॅलरीमध्ये शंभर ते दोनशे लोक रांगेत थांबलेले असतात. व सर्वर डाऊन असतो व दिवसेंनदिवस स्टेट बँक ऑफ इंडिया येथिल ATM पैसेच नसतात व परगावाहून ATM मध्ये पैसै करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना नाहक त्रास होत आहे शाखा अधिकारी साहेब म्हणतात तुम्ही काहीही करा मला काहीही फरक पडणार नाही.तुम्हाला जे काय करायचे ते करून घ्या माझी मी पाहतो काय होते ते.. तरी संबंधित स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाने या शाखाधिकारी व सुरक्षारक्षक यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करून सामान्य जनतेला न्याय द्यावा विनंती..
0 Comments