google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ॲड. श्रीहरी बागल यांची महामंडळावर वर्णी

Breaking News

ॲड. श्रीहरी बागल यांची महामंडळावर वर्णी

 

ॲड. श्रीहरी बागल यांची महामंडळावर वर्णी

मुंबई / फिरोज पिंजारी :- महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांची महामंडळावर वर्णी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाविकास आघाडीने आता वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. तसेच लवकरच विविध महामंडळावर अशासकीय सदस्य व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक चर्चा राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांची आहे. या महामंडळांवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय नोंदणीकृत पक्ष असताना सुध्दा मतांचे विभाजन होवू नये, यासाठी स्वतंत्र उमेदवार न देता राष्ट्रीय स्वराज्य सेनेने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वराज्य सेनेने महाविकास आघाडीच्या यशात सिंहाचा वाटा उचलला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले होते. या मेहनतीचे फळ म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांची महामंडळावर वर्णी लावण्याचा विचार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व ना. बाळासाहेब थोरात करीत असल्याचे समजते

Post a Comment

0 Comments