महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तात्काळ थांबवावे
भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची मागणी
सांगोला : थकित वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ आहे. कोरोना महामारीत सामान्य जनतेचे हाल झाले आहेत. वीज कापली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, शेतातील पिके जळून जातील. उन्हाळ्यात वीज तोडल्यास शेतीचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल. वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून वीज जोडण्याचे काम चांगले केलेले असताना गरजेच्या वेळी वीज तोडण्याचा प्रकार निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेऊन थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तात्काळ थांबवावे अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांच्याकडे केली आहे.कोरोना महामारीने गेले वर्षभर ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व नागरीक त्रस्त आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात देखील वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीज पुरवठा करण्याचे वाखाणण्यासारखे काम केले आहे. कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक गरजा भागवताना जवळजवळ सर्वांचीच तारेवरची कसरत होत आहे. आज काल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाईन चालू आहे. जर वीज पुरवठा नसेल तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. वीजबिल थकबाकीमुळे तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून केली जात आहे. वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्याटप्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उन्हाळ्यात वीज तोडल्यास शेतीचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल.सध्या परीक्षेचा काळ असून वीज कापली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, शेतातील पिके जळून जातील. थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तात्काळ थांबवावे अशी मागणी केली. सध्या शहरी भागासह, ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही वीज पुरवठ्यावर सुरु आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा बिले पाठवली आहेत आणि ती न भरल्यास वीजजोड तोडण्याचा धडाका लावला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कोरोनानंतर आता कुठे शेतकरी सावरला जात आहे, मात्र हे ही आघाडी सरकारला पाहवत नाही. शेतकऱ्यांचे वीजजोड त्वरित जोडावे आणि यापुढे जर शेतकऱ्यांचे वीज तोडण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी दिला आहे.
0 Comments