google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहीद जवान व देशाची सेवा करणाऱ्या जवान विषयी आदर सन्मान मला पाहिजे_____ प्रा डॉ जगन्नाथराव ठोंबरे

Breaking News

शहीद जवान व देशाची सेवा करणाऱ्या जवान विषयी आदर सन्मान मला पाहिजे_____ प्रा डॉ जगन्नाथराव ठोंबरे

 शहीद जवान व देशाची सेवा करणाऱ्या जवान विषयी आदर सन्मान मला पाहिजे_____ प्रा डॉ जगन्नाथराव ठोंबरे


विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे शहीद दिन साजरा करण्यात आला यावेळी शहीद भगतसिंग शहीद राजगुरू शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे प्रा डॉ जगन्नाथराव ठोंबरे अध्यक्ष अशोक राव शिंदे व व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले प्रमुख पाहुणे जगन्नाथराव ठोंबरे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की स्वाभिमान आत्मविश्वास साहस आणि बहादुरी ची मिसाईल म्हणजेच शहीद भगतसिंग हे होय ते एक महान क्रांतिकारी युद्ध होते वयाच्या तेविसाव्या वर्षी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर ती जाणारे व्यक्तिमत्व होते


त्यांच्या जगण्यातून आपणाला एक प्रेरणा ऊर्जा मिळते भारत हा इंग्रजांचा गुलाम होता पंजाब प्रांतातील बंगा गावामध्ये भगत सिंग यांचा जन्म झाला वडीलान बरोबर शेतात काम करत असताना पेरणी का केली शेतात पिके कशी येतात यासारखे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असे आपण जर शेतात बंदुका पेरल्या असंख्य बंदुका निर्माण होऊन त्या ब्रिटीशांच्या विरुद्ध लढण्यास उपयोगी पडतील असे त्यांना असे असंख्य प्रश्न लहानपणी ते आपल्या वडिलांना विचारत असे जालियनवाला बाग हत्याकांड इंग्रज अधिकाऱ्याने लोकांवर बेछूट केलेला गोळीबार हजारो लोकांचे गेलेले प्राण या सर्व घटना भगत सिंग यांना अस्वस्थ करत होत्या वीस किलोमीटर पाई चालत जाऊन जालियनवाला बाग हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या घटनास्थळी पोहोचले रक्ताने माखलेली माती मिठीत घेऊन घरी गेले त्यावेळेस त्यांचे वय फक्त 12 वर्ष होते इंग्रज आणि बद्दल द्वेष व विरोधी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती ते ब्रिटिशांनी बरोबर सहकार पद्धतीने काम करत असे ब्रिटिशांना कोणतीही मदत न करणे सरकारी नोकरी सोडणे विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत न जाणे कोणतेही कर न भरणे सर्व विदेशी कपडे जाळणे यासारख्या गोष्टी भगतसिंग करत असल्यामुळे ब्रिटिशांना भारतात राज्य करणे अवघड जात होते भगत सिंग यांच्याविषयी पुढे बोलताना ते म्हणतात की चौरी चौरी हत्याकांड काकोरी कांड यासारख्या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या होत्या त्यांनी सायमन कमिशनला विरोध दर्शवण्यासाठी मोठे प्रदर्शन करण्यात आले इन्कलाब जिंदाबाद नारा देऊन ब्रिटिशांना सळो कि पळो करण्यात आले अशा या शहीद भगतसिंग शहीद राजगुरू शहीद सुखदेव यांना त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन तेव्हा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शहीद जवान व देशाची राष्ट्राची सेवा करणाऱ्या जवान विषयी आदर बाळगला पाहिजे त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा अशोकराव शिंदे म्हणाले की शहीद जवान यांच्या कर्तृत्वाचे व विचारांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे त्यांच्या कर्तुत्वाने आज भारत हा देश स्वातंत्र्य मध्ये गुण्या-गोविंदाने नांदत आहे तेव्हा शहीद जवानांची त्यांच्या विचारांची विद्यार्थ्यांना ओळख झाली पाहिजे त्यांच्यापासून प्रेरणा ऊर्जा घेतली पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला नियोजित समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक रिटे यांनी शहीद जवानांच्या चरित्र विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आदर्शवादी व्यक्तिमत्त्वाच्या विचारांची गरज स्पष्ट केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा डॉ रिटे यांनी केले तर आभार प्रा देशमुख दत्तात्रेय यांनी मानले कार्यक्रमाला उपस्थित प्रा बाबासाहेब इंगवले हेगडे सर पत्रकार रोहित हेगडे प्रा अमोल केदार प्रा संतोष राजगुरू सौ विमल ताई माने भजनावळे काका विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टन शन ठेवून पार पाडण्यात आला

Post a Comment

0 Comments