सोलापूर : विधूर 52 वर्षीय पुरुषासोबत बनावट विवाह करून त्यांची तीन लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाजणांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबाजी मैलारी कटके यांनी फिर्याद दिली असून खोटी माहिती व खोटी नावे सांगून त्या लोकांनी माझी फसवणूक केल्याचे कटके यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ हे पुढील तपास करीत आहेत
फिर्यादी अंबाजी मैलारी कटके यांच्या पहिल्या पत्नीचा चार वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू विधूर असल्याचा फायदा घेत सहाजणांनी मिळून कटके यांना विवाहाचे दाखवले अमिष सुनिता उर्फ प्रियंका सुनिल बनसोडे हिच्यासोबत विवाह लावून देण्याचे सर्वानुमते ठरले फुलचंद गुंजू चव्हाण याने कटके यांच्याकडून घेतले पाच हजार रुपये रोख आणि 40 हजारांचा धनादेश चेतन प्रल्हाद गायकवाड व शिवगंगा उर्फ गंगाबाई चेतन गायकवाड यांनीही घेतले दीड लाख रुपये 14 मार्च रोजी कटके व सुनिता उर्फ प्रियंका यांचा प्रताप नगर तांडा याठिकाणी विवाह झाला 16 माच रोजी चेतन व शिवगंगा हे कटके यांच्या घरी आले; मुलीचा मामा मयत झाल्याचे सांगून सुनिताला घेऊन गेले सुनिताने जाताना सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईलही घेतला; कॉल लागत नसल्याने कटके यांनी त्यांची केली चौकशी सहाजणांनी खोटे नाव, पत्ते खोटे सांगून रोकड, दागिने, मोबाइल, असे तीन लाख 13 हजाराला फसविल्याची कटकेंनी दिली पोलिसांत फिर्याद विजापूर नाका पोलिसांत सहाजणांविरुध्द गुन्हा; सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ हे करीत आहेत पुढील तपास आयएमपी ग्रीन सिटी अपार्टमेंट (विजयपूर रोड) याठिकाणी अंबाजी मैलारी कटके (वय 52) हे राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांच्य पत्नीचे निधन झाले आहे. ते विधूर असल्याची संधी साधून नेहरू नगर परिसरातील फुलचंद गुंजू चव्हाण याच्यासह अन्य पाचजणांनी त्यांना सुनिता उर्फ प्रियंका बनसोडे हिच्यासोबत विवाह लावून देण्यासंदर्भात 7 मार्च रोजी बोलणे झाले. कटके यांनी विवाहाला होकार दिला आणि त्यानंतर फुलचंदने कटके यांच्याकडून 45 हजार रुपये घेतले. त्यानंतर चेतन गायकवाड व शिवगंगा चेतन गायकवाड यांनीही दीड लाख रुपये घेतले. ठरल्याप्रमाणे 14 मार्चला प्रतापनगर तांडा येथे विवाह झाला. मात्र, विवाहानंतर दोनच दिवसांत मुलीचे मामा मयत झाल्याचे सांगून चेतन व शिवगंगा हे सुनिताला घेऊन गेले. त्यानंतर 21 मार्चपर्यंत सुनिता घरी आलीच नाही. कटके यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची नावे, त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर चौकशी केली. मात्र, सहाजणांनी दिलेली माहिती खोटी निघाली आणि कटके यांनी पोलिसांत धाव घेतली.
0 Comments