आज सांगोला शहरामधील राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून आज सांगोला तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले
सांगोला प्रतिनिधी:- आज सांगोला शहरामधील राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून आज सांगोला तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.हे निवेदन सांगोल्याचे मा. तहसीलदार साहेब अभिजीत पाटील यांना देण्यात आले. हे निवेदन पदोन्नतीच्या कोट्यातील 33 टक्के आरक्षित पदे दिनांक 52/05/ 2004 च्या आदेशाप्रमाणे मागासवर्गीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना पदोन्नती देऊन भरणेबाबत होते. हे निवेदन बामसेफ विंगच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी शहरातील पदाधिकारी मा. बापूसाहेब ठोकळे,आबासाहेब शेजाळ गुरुजी,सिद्धार्थ गडहिरे, चंद्रशेखर वाघमारे.आहमद सय्यद,दाजीराम लवटे,अनिल वाघमारे,पत्रकार हामिदभाई बागवान व इतर पधादिकारी उपस्थित होते.
0 Comments