google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलीला भेटायला गेलेल्या आईचा खून ; पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने प्रेत विहिरीत टाकले ; पोनि राजकुमार केंद्रे

Breaking News

मुलीला भेटायला गेलेल्या आईचा खून ; पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने प्रेत विहिरीत टाकले ; पोनि राजकुमार केंद्रे

 मुलीला भेटायला गेलेल्या आईचा खून ; पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने प्रेत विहिरीत टाकले ; पोनि राजकुमार केंद्रे


मुलीला भेटायला गेलेल्या चाळीस वर्षाच्या आईस मुलीच्या २ नंदा व नंदेचा मित्र या तिघांनी मिळून त्या मुलीच्या आईचा खून करून विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक ३० रोजी माढा तालुक्यातील दगड अकोले येथे घडली आहे .लक्ष्मी गोकुळ पवार रा . तरंगवाडी तालुका इंदापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे . 


याबाबत मयत लक्ष्मी पवार यांची बहीण ताई अशोक काळे हिने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक माहिती अशी की मयत लक्ष्मी पवार यांच्या कोमल नावाच्या मुलीचे लग्न माढा तालुक्यातील दगड अकोले येथील सोमनाथ अगतराव काळे यांच्याशी झाले होते . दोन वर्षांपूर्वी सोमनाथ याचा एका अपघातात मृत्यू झाला होता . कोमलची सासु विमल काळे , सासरा आगतराव काळे , ननंद प्रीती व कीर्ती हे सर्वजण कोमलला शारीरिक व मानसिक त्रास देत होते व कोमलची आई लक्ष्मी पवार यांना भेटू देत नव्हते . शनिवार दिनांक ३० रोजी लक्ष्मी पवार , बहिण ताई काळे , चुलत भाऊ अतुल शंकर काळे , जावई करण भोसले , मेहुणा माणिक भोसले हे सगळे तरंगवाडी येथून दगड अकोले येथे हे कोमलला भेटण्यास गेले होते .परंतु कोमलची ननंद प्रितीने फोनवरून लक्ष्मी पवारला सांगितले की तू एकटी भेटायला ये तेव्हा लक्ष्मी एकटी निघाली असता बहिण ताईने सांगितले की लक्ष्मी तुझा फोन चालू ठेव मी पण माझा फोन चालू ठेवते शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हे सर्व घडत असताना लक्ष्मी कोमलच्या घरी गेली तेव्हा लक्ष्मीच्या फोनवरून ताईला आवाज आला की आई ग मेले यानंतर ताईने वारंवार फोन करून लक्ष्मीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु लक्ष्मीचा फोन बंद लागत होता .

यानंतर सर्वजण परत तरंगवाडीला गेले व रविवारी सकाळी टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये आले व शनिवारी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला . पोलिस त्यांना घेऊन दगड अकोले येथे गेले व शनिवारी घडलेल्या प्रकाराबद्दल प्रीती काळे हिच्या कडे चौकशी केली तेव्हा प्रीतीने सांगितले की लक्ष्मी पवार ही मुलगी कोमलचा दुसरा विवाह करून देणार होती व लक्ष्मीने माझा भाऊ सोमनाथवर करणी केली होती म्हणून मी , माझी बहीण कीर्ती व माझा मित्र रॉकी आम्ही तीघांनी लक्ष्मीचा खून करून तिच्या अंगाला दगड बांधून कॅनल जवळील विहिरीत टाकून दिले आहे . पोलिस प्रीतीला घेऊन विहिरीवर गेले व दोन पोहणाऱ्या व्यक्तींना विहिरीतून प्रेत सापडते का ते पाहण्यास सांगितले . त्या दोन व्यक्तींनी काही वेळातच लक्ष्मी ' चे प्रेत बाहेर काढले तेव्हा लक्ष्मी च्या गळ्यावर व हातापायावर वार केल्याचे दिसून आले . टेंभुर्णी पोलिसांनी प्रीती काळे , कीर्ती काळे व प्रीती काळेचा मित्र रॉकी या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments